अनंत चतुर्दशी व्रत व महात्म्य Anant Chaturdashi Vrat Mahatmya

अनंत चतुर्दशी व्रत व महात्म्य Anant Chaturdashi Vrat Mahatmya

Anant-Chaturdashi-Vrat-Mahatmya

अनंत चतुर्दशी व्रत व महात्म्य Anant Chaturdashi Vrat Mahatmya या व्रताची माहिती आपण घेणार आहोत.

दरवर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंतरूपी श्रीविष्णूची पूजा करण्याची परंपरा अनेक कुटुंबांत आहे. हे एक कौटुंबिक आणि काम्य व्रत आहे. काम्य व्रत म्हणजे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे व्रत असणारे व्रत होय.

हे व्रत सध्या फार प्रचलित नाही. परंतु जाणकारांनी जिज्ञासू लोकांसाठी या व्रताची माहिती याठिकाणी जाणीवपूर्वक देत आहे. आपण ही माहिती वाचतो आणि निश्चितच अनंत चतुर्दशीचा महिमा इतरांनाही सांगाल.

गणेशोत्सव निबंध मराठी

कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने घेतलेले हे व्रत परंपरेने अखंडपणे पुढे चालू राहते. या अनंत देवतेचे प्रतीक म्हणजे चौदा गाठी असलेला एक रेशमाचा दोरा, पूर्वी ज्यांनी हे व्रत चालविलेले असेल त्यांच्याकडून व्रत करणाऱ्याने हा दोरा विधिपूर्वक घेऊन तो देवघरात ठेवावयाचा असतो. दरवषी अनंत चतुर्दशीला त्याची यथाविधी पूजा करावयाची असते.

या पूजेची रचना व तयारी सत्यनारायण पूजेप्रमाणेच असते. चौरंगावर दर्भाच्या बनविलेल्या सात फण्यांच्या शेषस्वरूप अनंत नागाची प्राणप्रतिष्ठापना करून त्याच्या पुढे अनंत दोरक ठेवतात. त्याची पूजा केली जाते. या पूजेत यमुना नदी व शेषनाग यांचीही पूजा करावयाची असते. या अनंतपूजेत १४ या संख्येला फार महत्त्व आहे. अनंत दोरकाला १४ गाठी असतात. नैवेद्य १४ लाडू, १४ करंज्या, १४अपूप इत्यादी पदार्थ असतात. हे व्रत कमीत कमी १४ वर्षे करावयाचे असते.

माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध

ही  अनंतपूजा कशासाठी करतात व ही पूजा पूर्वी कोणी केली होती, याविषयी अनेक आख्यायिका आहेत. पांडव कौरवांबरोबरच्या द्युतामध्ये हरल्यानंतर त्यांना बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला.

पांडव द्रौपदीसह वनवासात असताना एके दिवशी श्रीकृष्ण त्यांना भेटावयास  गेला होता. त्या वेळी अत्यंत दुःखी असलेल्या युधिष्ठिराने श्रीकृष्णाला वंदन करून विचारले ”श्रीकृष्णा, तूच आमचा सखासोबती, कैवारी आहेस. तुझे कृपाछत्र आमच्यावर सतत आहे. असे असताना आम्ही राज्यहीन झालो आहोत. या वनात अनंत दुःखे भोगत आहोत. काय केले असता आम्हाला पुन्हा राज्यप्राप्ती होईल? या दुःखातून मुक्त होण्यासाठी काय करावे? कोणते व्रत करावे ते कृपा करुन आम्हाला सांग.”

युधिष्ठिर हा पांडवांचा सर्वात मोठा भाऊ होता प्रत्येक गोष्ट ही धर्माधिष्ठित आणि धर्मविधी प्रमाणे करण्याची त्याची पद्धत होती. तो अतिशय सत्यवचनी होता.

युधिष्ठिराने असे विचारले असता श्रीकृष्ण म्हणाला,“सर्व व्रतांमध्ये उत्तम असे अनंतपूजेचे व्रत तुम्ही करा. म्हणजे तुम्हाला लवकर राज्यप्राप्ती होईल. अवघ्या विश्वाला व्यापून उरलेला ब्रह्माविष्णुमहेशस्वरूप असा जो अनंत तो मीच आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या दिवशी अनंताची यथाविधी पूजा केली असता सर्व दुःखांचा नाश होतो, व सुखसमृद्धी प्राप्त होते. अनंत चतुर्दशीचे हे व्रत पूर्वी कोणी केले होते ते ऐक.’

पूर्वी कौंडिण्य नावाचे एक क्रषी होते. त्यांच्या पत्नीचे नाव सुशीला. कौंडिण्य अत्यंत गरीब, दरिद्री होते. सुशीला अत्यंत गुणवती होती. सुशीला आपल्या पतीची अगदी मनोभावे सेवा करीत असे. आपले दुःख, दारिद्र्य जावे म्हणून ती दररोज भगवान विष्णूची भक्ती करीत असे. एकदा ती कंदमुळे, फुले आणण्यासाठी वनात गेली. तेथे एका नदीच्या काठावर काही स्त्रिया पूजाअर्चा करीत होत्या. सुशिलेने त्यांच्या जवळ जाऊन त्यांना विचारले – “तुम्ही ही कसली पूजा करीत आहात? ही पूजा केल्याने काय फळ मिळते ते मला सांगा.”

त्या स्त्रिया म्हणाल्या की,”आम्ही ही भगवान महाविष्णू शेष नारायण अनंताची पूजा या ठिकाणी करीत आहोत. प्रत्येक वर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंताची पूजा करावयाची असते. यालाच अनंत चतुर्दशीव्रत असे म्हणतात. ही अनंतपूजा केली असता सर्व सुखसमृद्धीची प्राप्ती होते. अनंतस्वरूप भगवान विष्णूची आपल्यावर कृपा होते. त्या स्त्रियांनी असे सांगितले असता सुशिलेने अनंताची पूजा कशी करावयाची ते त्यांच्याकडून समजावून घेतले आणि ती आपल्या आश्रमात गेली. सुशीलने अनंताचे व्रत करण्याचे ठरवले.

मग सुशिलेने यथाविधी अनंताची पूजा केली. आपल्या डाव्या हातावर अनंताचा दोरक बांधला. दोरक म्हणजे दोरा. या व्रतामुळे तिच्यावर अनंताची कृपा झाली. तिचे घर धन-धान्य-गोधनाने भरून गेले. घरात सुख-शांती-समाधान नांदू लागले.

एके दिवशी कौंडिण्याने सुशिलेच्या हातावरील अनंत दोरक पाहिला आणि तिला विचारले,“हे हातावर तू काय बांधले आहेस? “सुशीला म्हणाली ,”हा अनंत आहे. मी अनंत चतुर्दशीचे व्रत केले. त्यामुळे आपल्याला सुखसंपत्ती प्राप्त झाली आहे.” हे ऐकताच कौंडिण्याला  खूप राग आला. कौण्डिन्य ऋषीला आपल्या ज्ञानाचा गर्व झाला होता.

तो म्हणाला, “आपल्याला सुखसमद्धी मिळाली आहे. ती माझ्या कष्टामुळे आणि माझ्या ज्ञानामुळे. यात अनंताचा काहीही संबंध नाही,” असे म्हणून कौंडिण्याने तो अनंतदोरक हिसकावून घेतला आणि अग्नीत टाकून दिला.

कौंडिण्य ऋषीच्या या कृतीमुळे अनंतव्रताचा अपमान झाला. अनंताचा कोप झाला. कोंडिण्याची सारी संपत्ती नष्ट झाली. सुशिलेला अतिशय दुःख झाले. ती शोक करू लागली. अनंत परत मिळाल्याशिवाय अन्नपाणी घेणार नाही, असा तिने निश्‍चय केला. उपासामुळे सुशीलेची स्थिती अतिशय करुणास्पद झाली.

“कौोंडिण्याचे डोळे उघडले. त्याचा गर्व नाहीसा झाला. अत्यंत दुःखी झालेला तो अनंताला शोधण्यासाठी अनंताचा धावा करीत रानावनात फिरू लागला. रानात जो कोणी भेटेल त्याला तो विचारू लागला. “तुम्हाला अनंत कोठे दिसला का?” प्रत्येकजण ‘नाही’ असे उत्तर देत असे. त्या वनात कौंडिण्याला एक आंब्याचे झाड दिसले. त्या आंब्याच्या झाडावर खूप फळे होती.

पण एकही पक्षी त्या आंब्याच्या झाडाकडे फिरकत नव्हता. पुढे त्याला एक बैल दिसला. त्याच्यापुढे भरपूर चारा आणि वैरण होती. पण त्याला तो खाताच येत नव्हता. कौंडिण्य पुढे गेला. त्याला दोन सरोवरे दिसली. पण त्यांतले पाणी कुणीच पीत नव्हते. पुढे गेल्यावर त्याला एक गाढव व एक हत्ती दिसला. ते दोघे नुसतेच उभे होते. कोणी काही बोलत नव्हते. काही सांगत नव्हते. दुःख. कष्टी झालेला, आणि अगदीच पश्चात्तापाने पोळलेला कौंडिण्य जमिनीवर गडबडा लोळू लागला.

“अनंत…अनंत” अशा हाका मारू लागला. त्याला पश्‍चात्ताप झालेला पाहून भगवान अनंताला त्या दया आली. तो ब्राह्मणरूपाने तेथे प्रकट झाला. कौंडिण्याने त्याच्या पायांवर डोके ठेव , तुम्ही तरी अनंत कोठे पाहिलात का? त्या वेळी मीच तो अनंत असे तो ब्राह्मण , आणि त्याच क्षणी चतुर्भुज भगवान अनंत तेथे प्रकट झाले. कौंडिण्याचे सांत्वन करून ते म्हणाले, तुला जो आम्रवृक्ष भेटला होता तो गतजन्मी विद्वान ब्राह्मण होता. परंतु त्याला तुझ्याप्रमाणेच आपल्या ज्ञानाचा गर्व होता. त्याने कुणालाही विद्यादान केले नाही. ” म्हणून त्याची ज्ञानकळे कडू झाली. ”

“तुला जो बैल दिसला तो गेल्या जन्मी मोठा श्रीमंत माणूस होता. त्याने खूप दान केले होते. पण त्याला त्या दानाचा मोठा गर्व होता. आणि म्हणून आता त्याच्यापुढे गवत असतानाही त्याला ते खाता येत नाही. तुला जी दोन सरोवरे दिसली. त्या गतजन्मी दोन बहिणी होत्या. दानधर्माचा पैसा दुसऱ्याकडे जाऊ नये म्हणून त्या एकमेकींनाच  दान देत असत. त्यांच्या संपत्तीचा इतरांना काही उपयोग झाला नाही. म्हणून त्या सरोवराचे पाणी कुणीही पीत नाही.

तुला जे गाढव दिसले ते गतजन्मी अत्यंत क्रोधी होता व जो हत्ती  दिसला तो गतजन्मी एक धर्मनिंदक व दुसऱ्यांना तुच्छ लेखणारा माणूस होता. तू सुद्धा स्वतःच्या ज्ञानाचा गर्व केलास. सुशिलेच्या श्रद्धेला तुच्छ मानलेस. गर्व, अहंकार, देवधर्माबद्दल तुच्छता यामुळेच तुला हे सारे दुःख भोगावे लागले आहे. आता तुला पश्‍चात्ताप झाला आहे. म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. हे बघ, आता तू घरी जा व अनंताचे व्रत कर म्हणजे तुला सर्व सुख प्राप्त होईल व शेवटी मोक्षचीही प्राप्ती होईल.”

“कौंडिण्याला सगळे पटले. त्याचा गर्व नाहीसा झाला. त्याने घरी जाऊन पुन्हा सुशिलेसह अनंत चतुर्दशीचे व्रत केले. त्यामुळे त्याला अनंत वैभव प्राप्त झाले.”

अनंत चतुर्दशी व्रत व महात्म्य Anant Chaturdashi Vrat Mahatmya

 

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment