America For Me

America For Me

America For Me या लेखात एक सामान्य भारतीय म्हणून मला काय वाटते.हे मोकळेपणाने मांडले आहे

अमेरिका खंड या अर्थाने नाही तर संयुक्त संस्थाने USA या अर्थाने अमेरिकेचे मी उल्लेख करतो. 11 सप्टेंबर 1893 या दिवशी भारताचे महान सुपुत्र स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेतील सर्वधर्म परिषदेमध्ये एक भाषण केले. त्या भाषणाचा इतिहास आम्ही भारतीय लोक फार गौरवाने एकमेकांना सांगत असतो.

अमेरिका USA हा देश आमच्याकडे संयुक्त संस्थाने USA यापेक्षा अमेरिका या शब्दानेच विशेषकरून ओळखला जातो. अमेरिकेमध्ये जाऊन शिकावे आणि त्या ठिकाणी नोकरी करावी असे लक्षावधी भारतीयांचे स्वप्न असते. अमेरिकेबद्दल भारतीयांना प्रचंड आकर्षण आहे, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अमेरिकेतील वातावरणाबद्दलचे असलेले वलय. अमेरिकेबद्दलचे कुतूहल आणि जिज्ञासा सर्वच भारतीयांमध्ये असते.

America For Me Lyrics

अमेरिकेबद्दल भारतीयांमध्ये प्रचंड आकर्षण का निर्माण झाले असावे? हा प्रश्न मला पडतो तेव्हा मला स्वामी विवेकानंद यांची आठवण विशेष करून होते. याचे कारण असे की 11 सप्टेंबर 1893 रोजी स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेन लोकांना माझ्या अमेरिकेतील बंधू आणि भगिनींनो असे संबोधले होते. स्वामी विवेकानंदांनी भारतीयांचा प्रतिनिधित्व करताना सर्व अमेरिकन लोकांना बंधुत्वाच्या नात्याने जोडले त्यामुळे प्रत्येक भारतीयाला अमेरिकन लोक बांधव वाटणे स्वाभाविक आहे.

स्वामी विवेकानंदांनी विश्वधर्म परिषदेमध्ये अनेक भाषणे दिली आणि आपल्या व्यक्तिमत्वाने जगभरातील लोकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकले. हिंदू धर्मातील वेदांत, राजयोग, ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग इत्यादी उपासना पद्धतींचा आधुनिक विज्ञानाची मेळ घालून स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतील लोकांना विचारप्रवण केले. अमेरिकेतील लोकांना ख्रिश्चन धर्माचा अधिक सखोल अर्थ सांगण्याचे काम विवेकानंदांकडून सुद्धा झाले. त्यामुळे त्यांना अमेरिकेमध्ये लोकप्रियता अधिकाधिक मिळत गेली.

विसाव्या शतकाच्या मध्यावर जगामध्ये दुसरे विश्व युद्ध झाले.भारतावर त्यावेळी ब्रिटिशांचे राज्य होते. ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय सैन्य होते हे सैन्य अतिशय शर्थीने लढले. साऱ्या जगाला त्यांच्या पराक्रमाचा हेवा वाटला. अमेरिकेतील लोकांना या गोष्टीचे निश्चितच जाणीव होती. त्याच काळामध्ये भारतीय स्वातंत्र्यलढा अखेरच्या टप्प्यात आला. अमेरिकेच्या अध्यक्षांच्या भारताला स्वातंत्र्य द्यायला हवे या विचाराचा प्रभाव ब्रिटिश राज्यकर्त्यांवर पडलेला आहे.

दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंडचे अपरिमित नुकसान झाले राज्य करणे शक्य नाही ही ब्रिटिश जाणून होते. भारतीयांची स्वातंत्र्या बद्दलची महत्वाकांक्षा चरम सीमेला जाऊन पोहोचला होता.त्याचा परिणाम म्हणून भारताला स्वातंत्र्य मिळाले.

अमेरिकेचा स्वतंत्र लढा इतिहासात वाचतांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याची सहज तुलना केली जाते.

अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन भारतामध्ये फार लोकप्रिय आहेत. भारतीय लोक अब्राहम लिंकन चरित्र वाचतात.भारतीयांना पाठ्यपुस्तकांमध्ये अब्राहम लिंकन बाबत पाठ असतात. अब्राहम लिंकन कडून कोट्यवधी भारतीय लोकांनी प्रेरणा घेतली आहे.

भारत हा फार मोठा लोकशाही देश आहे. अमेरिका सुद्धा फार मोठा लोकशाही देश आहे. त्यामुळे या दोन्ही लोकशाही देशांमध्ये नेहमीच सुसंवाद असावा आणि एकमेकांची प्रगती त्यामधून व्हावी असे आम्हा भारतीयांना वाटते.

भारतातून अमेरिकेमध्ये गेलेल्या लक्षावधी लोकांनी तेथील अर्थव्यवस्थेला निश्चितच हातभार लावला आहे. आणि अमेरिकेने सुद्धा माझ्या भारतीय बंधू-भगिनींना अतिशय प्रेमाने पालकत्वाच्या नात्याने सांभाळले आहे असे मला वाटते.

अमेरिका हा देश हा जगातील एकमेव महासत्ता म्हणून ओळखला जातो. आर्थिक, राजकीय, सामरिक, वैज्ञानिकदृष्ट्या हा देश बलाढ्य आहे. भारत आणि अमेरिकेमध्ये सध्या चांगले संबंध निर्माण झाले आहेत.

मला व्यक्तिशः अमेरिकेबद्दल आकर्षण आहे. अमेरिका America For Me देश फिरुन यावे असे वाटते. माझ्या मुलांनी अमेरिकेत जावे. त्या ठिकाणी शिकावे.त्या ठिकाणी व्यवसाय करावा आणि बंधुत्वाच्या नात्याने अमेरिकन लोकांशी संबंध जोडावेत, असे मला सतत वाटत आले आहे.

हे विश्वची माझे घर निबंध Essay on He Vishwachi Maze Ghar

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment