5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन 5th October World Teachers Day

5 ऑक्टोबर जागतिक शिक्षण 5th October World Teachers Day

भारत देशामध्ये शिक्षक दिन 5 सप्टेंबरला उत्साहात साजरा होत असतो.असाच देशोदेशी सुद्धा शिक्षक दिन साजरा होत असतो. एवढेच काय तर जगभरामध्ये जागतिक शिक्षक दिन World Teachers Day 5 ऑक्टोबरला दरवर्षी साजरा होऊन शिक्षकांप्रती आदर, प्रेम, कृतज्ञता व्यक्त केली जाते.

जागतिक शिक्षक दिन कधी साजरा केला जातो?

5 ऑक्टोबर या दिवशी जगभरामध्ये जागतिक शिक्षक दिन World Teachers Day किंवा आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन International Teachers Day साजरा केला जातो. विसाव्या शतकापासून विविध देशांमध्ये शिक्षक दिन साजरे केले जातात.भारतामध्ये शिक्षक दिन 1962 पासून तर जगभरात 1994 पासून साजरा केला जात आहे.

1966 मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटना( ILO )आणि युनेस्को(UNESCO) यांनी शिक्षकांच्या  दर्जा संदर्भात एक महत्वपूर्ण शिफारस स्वीकारली. या शिफारशी स्विकारण्याच्या वर्धापन दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन साजरा होत आहे. या शिफारशींमध्ये शिक्षकांचे हक्क, त्यांच्या विविध जबाबदाऱ्या, त्यांची प्राथमिक तयारी,त्यांचे शिक्षण – प्रशिक्षण, शिक्षकांचा रोजगार, अध्यापन शिकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मानक निश्चित करतात.

५ सप्टेंबर शिक्षक दिन भाषणे

जागतिक शिक्षक दिनाच्या निमित्ताने विविध कॅम्पेन चालवले जातात.

युनेस्को दरवर्षी हे जागतिक शिक्षक दिनाच्या निमित्ताने अभियान चालवते. शिक्षकाचे विद्यार्थी आणि समाजाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वपूर्ण स्थान आहे. शिक्षकाची त्यासंदर्भातील भूमिका यासाठी युनेस्को अशा प्रकारचे अभियान चालवते.

ही अभियान किंवा कॅम्पेन हे दरवर्षी वेगवेगळे असते. सन 2017 मध्ये एम्पाॅवरिंग टीचर्स नावाची थीम घेऊन जगभरात युनेस्कोने कॅम्पेन चालवले. सन 1997 मध्ये य उच्च शिक्षणाच्या संदर्भामध्ये असलेल्या स्थितीबाबत जे काम केले, त्याचा वर्धापनदिन म्हणून हे कॅम्पेन चालवले गेले होते.

2018 मध्ये युनेस्को ने “Right to education means right to a qualified teacher ” हे अभियान चालवले. सन 1948 मध्ये मानवी हक्कांचे डिक्लेरेशन झाले. त्याचे स्मरण म्हणून वरील प्रकारचे अभियान युनेस्कोने चालवले होते.

भारतामध्ये 2009 यावर्षी शिक्षणाचा हक्क कायद्याने प्रस्थापित झाला. विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे. त्याबरोबरच या अधिकाराच्या प्राप्तीसाठी चांगले प्रकारचे दर्जेदार शिक्षक असणे आवश्यक आहे. त्यांना चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण दिले पाहिजे. ही भूमिका घेऊन उपरोक्त अभियान जगभर चालवले गेले.

डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन निबंध मराठी

देशोदेशींचे शिक्षक दिन

जगभरातील जवळजवळ शंभरापेक्षा जास्त देश हा शिक्षक दिन विविध उपक्रम राबवून साजरा करतात. युनेस्कोचे कॅम्पेन जगभर राबवले जाते. असे असले तरीही काही देश आपल्या परंपरा आणि संस्कृतीनुसार वेगवेगळ्या दिवशी येईल शिक्षक दिन साजरा करत असतात. उदाहरण भारताचे घेता येईल. भारतामध्ये 5 सप्टेंबरला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिनी शिक्षक दिन साजरा केला जातो.

ऑस्ट्रेलियामध्ये मात्र कोणतीच तारीख शिक्षक दिनासाठी निश्चित नाही. ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी शिक्षक दिन साजरा होतो.

अर्जेंटीनामध्ये डाॅमिंगो फाॅस्टिनो सारमिएन्टोस यांच्या स्मृतिदिनी 11 सप्टेंबरला सण 1915 पासून शिक्षक दिन साजरा होत आलेला आहे.

शिक्षक दिनाच्या प्रसंगी काही देशात शिक्षकांची प्रतिज्ञा किंवा शपथ सुद्धा आयोजित केले जाते. भारतामध्ये भारताचे माजी राष्ट्रपती आणि प्रसिद्ध वैज्ञानिक भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी जी शपथ दिली आहे ती म्हटली जाते.

दिनविशेष ऑक्टोबर महिना

शिक्षकांसाठी शपथ

सॉक्रेटिस हा जगप्रसिद्ध शिक्षक आणि तत्त्वज्ञानी म्हणून प्रसिद्ध होता. त्यांची शिकवण्याची पद्धत ही एक आगळी वेगळी पद्धत होती. त्याने शिक्षकांची प्रतिज्ञा दिलेली आहे. ही प्रतिज्ञा सुद्धा अनेक देशात शिक्षक दिनी म्हटली जाते.

जागतिक स्तरावर जागतिक शिक्षक दिन साजरा करून शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला जातो. शिक्षक जागतिक संस्कृतीचा पायाभूत घटक असून संस्कृतीचा मूल्यवर्धक समजला जातो.

शिक्षकाचे कोणत्याही व्यक्तीच्या जीवन विकासामध्ये अनमोल असे योगदान असते. शिक्षकाच्या विविध प्रकारच्या कार्यातून समाज घडत असतो. शिक्षकाचे ही महत्त्वपूर्ण कार्य कुठेतरी गौरविले जावे म्हणून शिक्षक दिन साजरा केला जातो.

शिक्षक दिनाच्या निमित्ताने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना विविध सन्मान आणि पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. युनेस्को सुद्धा शिक्षकांचा गौरव करत असते. विविध देशांच्या शैक्षणिक धोरणांमध्ये शिक्षकांसाठी असणारी उद्दिष्टे यामागे युनिस्कोने ठरवून दिलेली किंवा शिफारस केलेली उद्दिष्टे असतात.

गुरू देवो भव

भारतामध्ये फार प्राचीन काळापासून गुरुपौर्णिमेचा सण साजरा केला जातो. हा सण म्हणजे एक प्रकारे शिक्षक दिनच आहे. या दिवशी सर्व शिष्य अर्थात विद्यार्थी आपल्या गुरुंना म्हणजेच शिक्षकांना मानवंदना देतात. अध्यात्मिक किंवा धार्मिक गुरु असतील तर त्यांची पूजा केली जाते. आपल्या गुरूंचा किंवा शिक्षकांचा मानसन्मान ठेवणे हे संस्कृतीला धरूनच आहे. त्यातून नैतिक मूल्यांची वृद्धी होत असते.

कोणत्याही राष्ट्राचे संदर्भात विचार केला तर, शिक्षक हा भावी पिढीचा एक महत्वपूर्ण शिल्पकार आहे. शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये एक जबाबदारीचा आणि महत्त्वाचा घटक आहे.

जागतिक शिक्षक दिन साजरा करण्यामध्ये युनेस्को काही महत्त्वाचे उद्दिष्ट ठेवून असते. त्यामुळे दरवर्षी युनेस्को वेगवेगळे उद्दिष्टे ठेवून अभियान राबवते. परिणामी शिक्षकांच्या विविध समस्या, शिक्षकांचा दर्जा आणि त्यांचे अधिकार, शिक्षकांचा सन्मान ठेवण्याची आवश्यकता जागतिक समाजाला पटत असते.

गुरुपौर्णिमा निबंध मराठी

गुरूंचा महिमा

शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये अंतर क्रिया होत असतात. त्यामुळे शिक्षकाला विद्यार्थी कळतो आणि विद्यार्थ्यांना अध्यापन घटकाचा असे कळतो. त्यामुळे खरे शिक्षण होत असते.ऑनलाइन पद्धतीने होणारे शिक्षण केले गुरुमुखी शिक्षण नसते. संगणक किंवा अन्य डिजिटल माध्यमांचा वापर केला तर माहितीत भर पडते.परंतु ज्ञानात खऱ्या अर्थाने भर पडायची असेल आणि विषयाचे आकलन जर व्हायचे असेल तर विद्यार्थ्याच्या समोर शिक्षक पाहिजे.

भारतीय संस्कृतीने शिक्षकाचा महिमा फार प्राचीन काळापासून वर्णन केला आहे. गुरुगीता आणि गुरुचरित्र सारखे ग्रंथ शिक्षकाचा महिमा एक प्रकारे वर्णन करताहेत.
आई हा मुलाचा पहिला गुरु असतो. आई आपल्या मुलाला तन आणि मन देत असते. आई आपल्या मुलावर जे संस्कार करते त्याला जगात तोड नाही. शंभर शिक्षक आणि आई यांचीसुद्धा तुलना होऊ शकत नाही. इतके गुरु म्हणून आईचे महत्त्व आहे.

असे असले तरी विद्यार्थ्यांच्या बुद्धीला एखाद्या शिल्पकार प्रमाणे किंवा हिरा घडवणाऱ्या कलाकाराप्रमाणे शिक्षकाचे महत्त्व आहे. आई आणि शिक्षक दोघेही गुरुच असतात. दोघांचे शिक्षक म्हणून असणारे महत्त्व अनन्य साधारण आहे दोघांच्याही कार्याला सलाम.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment