26 जानेवारी भाषण 26 January Speech in Marathi

26 जानेवारी भाषण 26 January Speech in Marathi

26 जानेवारी भाषण 26 January Speech in Marathi

26 जानेवारी हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला दिवस आहे. याच दिवशी भारताने प्रजासत्ताक स्वीकारले आणि आपला देश संसदीय लोकशाही स्वीकारणारा आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश झाला.

भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 या मंगल दिनी मिळाले असले तरी भारताने आपला राज्यकारभार व्यवस्थितपणे चालू ठेवण्यासाठी घटना समिती नेमली होती. डॉक्टर राजेंद्रप्रसाद घटना समितीचे अध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. आपल्या भारताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या घटनेच्या शिल्पकारांनी अतिशय सुंदर अशी राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी दिली आणि देशाने ती 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकारली.

आज आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन देशभर मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतो. लोकशाहीची फळे आपणच चाखतच वेगवेगळ्या क्षेत्रात भारताने अतिशय जबरदस्त प्रगती केली आहे. भारताच्या प्रगतीचा डंका साऱ्या जगभर गाजत आहे. त्यामुळे भारताचे स्वातंत्र्य हे लोकशाही प्रजासत्ताकामध्ये अतिशय सुंदरपणे रूपांतरीत झालेले दिसून येते.

राष्ट्रीय विज्ञान दिन वर निबंध 28 February National Science Day

26 जानेवारी 1930 या दिवशी भारतातील राष्ट्रीय सभा अर्थात काँग्रेसने प्रत्येक व्यक्तीने आपण स्वतंत्र आहोत.अशा पद्धतीने मनाशी ठरवून आपापल्या घरावर आणि महत्त्वाच्या ठिकाणी भारताचा झेंडा लावावा असे ठरले होते. त्या दिवसाचे महत्त्व जाणून 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक स्वीकारण्यासाठी निश्चित केला गेला होता. त्यानुसारच 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून पाळला जातो.

गेली 75 वर्षे भारत स्वतंत्र म्हणून जगामधील अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असून स्वतची प्रगती अव्याहतपणे करत आहे. भारतामध्ये विविध क्षेत्रात प्रगती झाली आहे. परंतु सद्यस्थितीतला माणूस मानवतेचे मूल्य हरवत चाललेला दिसून येतो. समाजाची बैठक पूर्णतः कोलमडत चालली आहे की काय असे वाटते. म्हणून या पवित्र आणि मांगल्याचे दिनी मला वाटते की माणसातला माणूस आपण शोधण्याची आज फार मोठी गरज निर्माण झाली आहे. म्हणून म्हणावे वाटते की अरे माणसा माणसा कधी होशील माणूस!

एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये अचाट अशी प्रगती झाली आहे आणि ह्या प्रगतीने हे माणसाचे डोळे दिपले आहेत.परंतु माणुसकीचा धर्म मात्र या प्रगतीच्या झगमगाटामध्ये लोपत चालला आहे. आजच्या घाईगर्दीच्या या आधुनिक युगात माणुसकीची वाढ पूर्णतः थांबली आहे. आज सगळीकडे संस्कारांचा अभाव निर्माण झाला आहे.

27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन 27 February Marathi Bhasha Gaurav Din

आपण शाळेत प्रतिज्ञा म्हणतो. वडीलधार्‍या माणसांचा आदर करण्याची प्रतिज्ञा म्हणून सुद्धा वडीलधाऱ्यांचा पदोपदी अपमान होताना दिसून येतो. सारे भारतीय माझे बांधव आहेत असे आपण म्हणतो खरे परंतु स्वतःच्या भावाशी भावासारखे वागायला आज लोकांना लाज वाटू लागली आहे. असे वाटते की रामायणातले भरताचे बंधुप्रेम या महाभारतामधून कायमचे संपून गेले आहे की काय? संस्कारांचे निशाण जणूकाही डळमळले आहे. त्यामुळे माणुसकीच्या धर्माची पताका उंच उंच फडकवत ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकावर येऊन पोहोचलेली आहे.

आज आपल्या देशामध्ये जातीयता, प्रांतभेद,बलात्कार-खून, दहशत, असुरक्षितता यांचे अतिशय दुर्गंधीयुक्त शेवाळ जीवनाच्या प्रवाहामध्ये सर्वत्र दाटले गेले आहे;असेच दिसून येत आहे आहे. हे जातीयता,प्रांतभेद, मत्सर,दहशत यांचे शेवाळ काढण्याची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीवर येऊन पोहोचते. तरच भारताच्या लोकशाहीला अर्थ राहील. नाहीतर सर्वत्रच अनर्थ दिसून आल्या शिवाय राहणार नाही.

इंग्रजांच्या जोखडातून आपला भारत देश मुक्त करताना राष्ट्र भक्तांनी क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्याबाबत काही स्वप्ने पाहिली होती.ही स्वप्ने खरोखरच साकार झाली आहेत काय? हे या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आत्मपरीक्षण करून पाहणे गरजेचे आहे.

आज दरवर्षी हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्याला आपण बळीराजा असे समजतो, परंतु शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा भागल्या जात नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण प्रचंड प्रमाणात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारचे औदासिन्य आल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यांच्या आर्थिक स्थितीत शासनाने आणि एकंदरीत समाजाने जाणीवपूर्वक विचार करून त्यामध्ये सुधारणा कशी घडवता येईल.या दृष्टीने जोरदार प्रयत्न होणे गरजेचे आहे.तरच खऱ्या अर्थाने बळीराजाचे राज्य या देशामध्ये येईल.कारण तोच या देशाचा खऱ्या अर्थाने पोशिंदा आहे. आजही 60 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त शेतकरी आपल्या भारत देशामध्ये असून देशाची अर्थव्यवस्था शेतकऱ्यांवरच खऱ्या अर्थाने अवलंबून आहे.

आपल्या देशातील कामगार वर्ग, शेतमजूर, भिक्षा मागणारे लोक, दऱ्याखोऱ्यात राहणारे आदिवासी बांधव, त्याच प्रमाणे झोपडपट्ट्यांत राहून दारिद्र्यात जीवन कंठणारे गोरगरीब लोक यांच्यापर्यंत स्वातंत्र्याची फळे गेली नाहीत. असेच आजही आपल्याला दुर्दैवाने त्यांच्या परिस्थितीकडे पाहिले तर आपल्याला म्हणावे लागेल.

आजही आपल्या देशामध्ये मध्यम वर्ग आणि श्रीमंत वर्गांच्या गरजांना प्राधान्याने अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्व देऊन त्यांचे लांगूलचालन केले जाते आणि गोर गरीब दारिद्र्यात जीवन कंठणारा सारा वर्ग दारिद्र्यरेषेमध्ये सुद्धा ठेवला जात नाही. ही देशातील गोरगरीब जनतेच्या शोकांतिकेची गाथा आणि दुःखभरी व्यथा आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने जनतेचे राज्य असेल तर उपजीविकेची आणि आर्थिक फायद्याची साधने जनतेच्या सर्व स्तरापर्यंत समान पद्धतीने पोहोचली पाहिजेत असे मला या निमित्ताने देशाच्या राज्यकर्त्यांना, उद्योगपतींना, समाजधुरीणांना आणि विचारवंतांना मुद्दाम सांगावेसे वाटते.

एकूणच काय माझा भारत देश सुखी आणि संपन्न असेल.भारताचे नागरिक समाधानी असतील आणि बंकिमचंद्र चॅटर्जी वंदे मातरममध्ये म्हणतात त्याप्रमाणे माझा भारत देश सुजलाम् सुफलाम् असेल. येथील प्रत्येक व्यक्ती सुखी आणि समाधानी होईल असे आपण काहीतरी नक्कीच संकल्प यानिमित्ताने केले पाहिजेत. चला तर मित्रांनो, आपल्या भारत देशाविषयीचे देशभक्त आणि क्रांतीकारकांचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सारे प्रयत्न करूया आणि मग सार्‍या जगाला अभिमानाने सांगूया,
सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्ता,
हमारा हम बुलबुलें उसकी,
ये गुलिस्तान हमारा !!

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment