1 मे जागतिक कामगार दिन 1May International Labour Day

1May International Labour Day 1 मे जागतिक कामगार दिन

या लेखात 1 मे जागतिक कामगार दिन 1May International Labour Day बाबत वास्तव माहिती जाणून घेणार आहोत.

जागतिक कामगार दिन International Labour Day केव्हा साजरा केला जातो?

International Labour Day
Image courtesy Wikipedia

1 मे (1May) हा दिवस जगभरातील कामगार चळवळींच्या कार्याच्या गौरवार्थ कामगार दिन International Labour Day म्हणून 80 पेक्षा जास्त देशांमध्ये पाळला जातो. कामगार दिन हा मे दिन May Day म्हणूनही साजरा केला जातो.या दिवशी राष्ट्रीय सुट्टीही जाहीर केली जाते. प्राचीन युरोपातील वसंत दिन या दिवशीच हा कामगार दिन पाळला जात आहे.

कामगार दिनापाठीमागील इतिहास Background Of International Labour Day

1 मे या दिवशी जो कामगार दिन International Labour Day पाळला जातो; त्या घटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी खूप महत्त्वपूर्ण आहे. औद्योगिक क्रांती झाल्यानंतर जगभर कारखानदारी निर्माण झाली. या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना 15-15 तास काम करावे लागे. कामाचे तास निश्चित असे नव्हते. कारखानदार लोक कामगारांचे शोषण करत. कामगारांच्या श्रमाला कवडीमोल किंमत दिली जाई. कामाचा विचार करता 19 व्या शतकाच्या मध्यावधीत कामाचे तास आठ हवेत ही मागणी जगभरातील कामगार संघटनांमध्ये पुढे आली.

जागतिक कामगार दिन

ऑस्ट्रेलियातील कामगार चळवळींनी 21 एप्रिल 1856 रोजी कामाच्या आठ तासांबाबत मागणी केली. ऑस्ट्रेलियामध्ये कामगारांच्या चळवळीला यश प्राप्त झाले. पुढे या मागणीचे लोन अमेरिका, कॅनडा या देशांमध्ये पोहोचले. त्या ठिकाणी 1 मे 1886 रोजी या मागणीसाठी धरणे आंदोलन मोर्चे इत्यादी पद्धतीने मागणीबाबत लोकशाही मार्गाने लढा चालू झाला. हा लढा चालू असताना 4 मे 1886 रोजी शिकागो येथे आंदोलनकर्त्यांवर गोळीबार झाला. त्यामध्ये सहा कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पोलिसांची ही कृती अतिशय वेदनादायी होती. कामगारांमध्ये त्यामुळे असंतोष निर्माण झाला.एका अज्ञात  व्यक्तीने पोलिसांवर बॉंब टाकला. ज्यात ८ पोलिसांचा मृत्यू झाला आणि ५० पोलीस जखमी झाले. काही कामगारांना जबाबदार धरून त्यापैकी आठ कामगारांना फाशीची शिक्षा झाली. त्या आठ कामगारांपैकी एकानेही बॉम्ब फेकला नव्हता की कोणतेही गुन्हेगारी कृत्य केलेले नव्हते. त्यामुळे जगभर संतापाची प्रचंड लाट उसळली.

महाराष्ट्र दिन 1 मे Maharashtra Day 1 May

या घटनेच्या आठवण म्हणून दिनांक १ मे १८९० रोजी आंतरराष्ट्रीय आंदोलनाचे आयोजन करण्याची मागणी रेमंड लेविन याने १९८९ च्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय पॅॅरीस परिषदेत केली. त्या परिषदेत १ मे १८९० हा जागतिक कामगार एकता दिवस International Labour Day म्हणून साजरा करण्याचे निश्चित झाले. १८९१ च्या दुसऱ्या परिषदेत या कामगार दिनाला औपचारिकरित्या मान्यता देण्यात आली.

भारतात कामगार दिन केव्हापासून साजरा केला जातो

भारतामध्ये 1 मे 1923 रोजी पहिल्यांदा लेबर किसान पार्टीने कामगार दिन International Labour Day पाळला. त्यासाठी लाल झेंडा हा कामगारांचा प्रतिनिधित्व म्हणून फडकवण्यात आला. कामगारांचे पुढारी सिंगरवेलू चेतिअर यांनी कामगार दिनासाठी पुढाकार घेतला होता.

भारतामध्ये हे कामगारांचे फार पूर्वीपासून प्रचंड पिळवणूक होत असे. कारखानदार कामगारांना कामाच्या मोबदल्यात कमी वेतन देत याशिवाय कामाचे तासही जास्त असत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नाने कामाचे तास आठ झाले. त्याचप्रमाणे कामगारांना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास वारसास नोकरी, भरपगारी सुट्टी बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून देण्याचे कार्य केले. त्याचप्रमाणे महिलांना प्रसूतीसाठी भरपगारी रजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालेली आहे.

2023 कामगार दिन थीम काय आहे? 2023 What is International Labour Day Theme?

प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय कामगार दिनाची International Labour Day ची विशिष्ट अशी थीम असते त्यानुसार वर्षभर कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करून कामगारांना यथोचित न्याय देण्यासाठी त्याचा वापर केला जातो. आंतरराष्ट्रीय कामगार दिनाची थीम आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सदस्यांनी तयार केलेली असते.
आंतरराष्ट्रीय कामगार दिन २०२३ ची थीम आहे – सुरक्षित आणि निरोगी कामकाजाचे वातावरण हे कामाच्या अधिकाराचे मूलभूत तत्त्व आहे.

महाराष्ट्राचा विचार केला तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.तेव्हापासून 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये 1 मे हा दिवस कामगार दिन म्हणूनही सर्व संघटित आणि असंघटित क्षेत्रातील सर्व कामगार वर्ग साजरा करत असतो. या कामगार दिनाच्या निमित्ताने सर्वत्र एकमेकांना शुभेच्छा दिल्या जाऊन उत्साह वाढवला जातो. कामगार वर्ग विषयक आदर व्यक्त केला जातो. कामगारांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा सरकार करत असते.कामगारांचे हक्क याबाबत मार्गदर्शन ठिकठिकाणी केले जाते.त्याचप्रमाणे कामगार वर्गासाठी केले गेलेले कायदे यावरही व्याख्याने आयोजित केली जातात.

अशा रीतीने1 मे जागतिक कामगार दिन 1May International Labour Day हा दिवस कामगारांच्या श्रमाच्या बाबत आदर बाळगण्याचा कामगारांचा गौरव करण्याचा,यथोचित असा सन्मान ठेवण्याचा, अन्याय होत असेल तर न्याय मिळवून देण्याचा, कामगारांच्या लढ्याचा स्मरणार्थ म्हणून साजरा केला जातो.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment