14 सप्टेंबर हिंदी भाषा दिवस14 September Hindi Bhasha Divas

14 सप्टेंबर हिंदी भाषा दिवस14 September Hindi Bhasha Divas

Essay on Hindi Bhasha Divas

14 सप्टेंबर हिंदी भाषा दिवस14 September Hindi Bhasha Divas

भारतामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणून हिंदी भाषा ओळखली जाते. खरेतर राष्ट्रीय भाषेचा दर्जा प्राप्त करण्याची क्षमता हिंदीला आहे. हिंदी ही भारताची अधिकृत प्रशासनाची भाषा असेल असा संविधान सभेमध्ये 14 सप्टेंबर 1949 रोजी निर्णय घेतला गेला.

भारताच्या राज्यघटनेतील भाग 17 मधील कलम 343(1) यामध्ये भारतीय संघराज्याची भाषा हिंदी असेल आणि लिपी देवनागरी असेल असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हिंदीला एक प्रकारचा कायदेशीर अधिकार प्राप्त झाला आहे.

सामान्यतः उत्तर भारतामध्ये हिंदी भाषा मोठ्या प्रमाणामध्ये बोलली जाते. भारताची मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, बिहार, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये हिंदी भाषा सर्वाधिक बोलली जाते. इतर राज्यांना आपली प्रादेशिक भाषा आहे. असे असले तरी राजस्थान गुजरात पंजाब महाराष्ट्र जम्मू-काश्मीर अशा राज्यांमध्ये हिंदी भाषा ही द्वितीय भाषा म्हणून अभ्यासली जाते.

5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन 5th October World Teachers Day

भारताच्या कोणत्याही राज्यात गेले तरी आपल्याला हिंदी भाषिक लोक आढळून येतात महाराष्ट्रातील मुंबई पुणे नाशिक नागपूर औरंगाबाद अशा मोठ्या शहरांमध्ये सुद्धा हिंदी भाषिकांची संख्या प्रचंड आहे. हिंदी भाषा या शहरांमध्ये सहज बोलली जाते. ग्रामीण महाराष्ट्रामध्ये सुद्धा हिंदी भाषा वापरली जाते. अर्थात मराठीसारखे महत्त्व हिंदी भाषेला महाराष्ट्रात कधीही मिळणार नाही.

हिंदी भाषा भारतातील प्रत्येक घटक राज्य मध्ये कमी जास्त प्रमाणात बोलली जाते. भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये हिंदी याला विरोध होत असला तरीसुद्धा त्या ठिकाणच्या की लोकांची भाषा हिंदी आहे उत्तर भारतातून दक्षिणेकडे जाणार्‍या पर्यटकांच्या संपर्कासाठी तेथील लोक हिंदी भाषा शिकून घेतात.

हिंदी भाषेला भारतामध्ये एक वेगळेच स्थान आहे. हे स्थान मिळवण्यासाठी हिंदी भाषेने खूप मोठा संघर्ष केला आहे.

1918 या वर्षी हिंदी साहित्य संमेलनामध्ये महात्मा गांधी   यांनी हिंदी ही राष्ट्रभाषा व्हावी अशी संकल्पना मांडली होती. हिंदी भाषेला राष्ट्रपिता महात्मा गांधींनी जनसामान्यांची भाषा असे संबोधले होते.

हिंदी भाषा दिवस केव्हा पासून साजरा केला जातो? असा प्रश्न आपल्या मनात निश्चितच असेल तर या प्रश्नाचे उत्तर असे आहे की,
सन 1953 च्या 14 डिसेंबर पासून हिंदी भाषा दिवस साजरा केला जात आहे.

हिंदी भाषेतील एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यकार राजेंद्र सिंह यांचा जन्मदिवस 14 सप्टेंबरच आहे. हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा व्हावी यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते. त्यांचा जन्मदिवस आणि हिंदी भाषा दिवस यांचा हा एक वेगळाच संबंध आहे.

हिंदी दिवस साजरा करताना अनेक प्रकारे उपक्रमांचे आयोजन केले जाते. हिंदी भाषा दिवस वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन आणि नियोजन करून साजरा केला जातो.

हिंदी भाषेमध्ये लेखन करणाऱ्या कवी, कादंबरीकार, चरित्रकार,नाटककार यांचा सन्मान आणि पुरस्कार देऊन केला जातो. या निमित्ताने निबंध लेखन स्पर्धा, वाद विवाद स्पर्धा, टंकलेखन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, समूहगीत गायन स्पर्धा, नाटक स्पर्धा, एकांकिका स्पर्धा यांचे आयोजन करून बक्षिसांचे वाटप केले जाते.

दरवर्षी हिंदी भाषेसाठी म्हणजेच हिंदी भाषेच्या प्रचारासाठी आपले अनमोल योगदान देणाऱ्या व्यक्तींचा एक लाख रुपयांचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. यानिमित्ताने राष्ट्रभाषा हिंदी सप्ताहाचे आयोजन सुद्धा केले जाते आठवडाभर हिंदी भाषा विषयक कार्यक्रम आणि उपक्रम अतिशय नियोजनपूर्वक राबवले जातात.

ठिकानी कविसंमेलनांचे आयोजन होते यामध्ये देशभरातून आणि जगभरातून विविध कवी आपल्या कविता सादर करतात. नवोदित कवींना संधी मिळावी यासाठी ही नवोदित कवींच्या कवी संमेलन भरवले जाते. काव्य रसिक आणि साहित्यप्रेमी मंडळींसाठी ही एक अपूर्व अशी संधी असते.

जगामध्ये इंग्रजी ही भाषा सर्वाधिक बोलली जाते त्यानंतर चिनी भाषेचा क्रमांक लागतो. हिंदी भाषा ही जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.हिंदी भाषिकांची संख्या प्रचंड आहे.

हिंदी भाषा जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये एक अध्ययन भाषा म्हणून शिकविले जाते. भारतात येणाऱ्या परदेशी लोकांना हिंदी भाषेचे ज्ञान व्हावे म्हणून ठराविक असा अभ्यासक्रम निर्माण केला गेला आहे.

वर्तमान युगामध्ये इंग्रजी भाषेने जगातील सर्वच भाषांवर प्रभाव निर्माण केलेला आहे. इंग्रजी भाषेचा जगातील सर्वच भाषा वर प्रभाव पडला आहे.हिंदी भाषा सुद्धा या गोष्टीला अपवाद नाही. हिंदी भाषेमध्ये सुद्धा अनेक वाक्यरचना या इंग्रजी भाषेवर आधारित अशा आहेत. हिंदी भाषिक लोक इंग्रजी शब्दांचा हिंदी मध्ये सहज वापर करताना आढळतात.

हिंदी भाषा ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची भाषा असली तरी संयुक्त राष्ट्रसंघाची अजूनही ती भाषा नाही. संयुक्त राष्ट्र संघाची भाषा होण्यासाठी किमान 129 देशांची संमती यासाठी आवश्यक आहे. यासाठी अधिकाधिक प्रयत्न होण्याची गरज वाटते. हिंदी भाषा राष्ट्रसंघाची जर भाषा झाली तर भारतीयांच्या गौरवामध्ये अधिकच भर पडेल.

राष्ट्रभाषा कीर्ती पुरस्कार यामध्ये 39 पुरस्कारांचा समावेश आहे. विविध समित्या मंडळ विभाग यांना हा पुरस्कार दिला जातो. हिंदी भाषे साठी कार्य करणाऱ्या समित्या मंडळे आणि विभागात यांना हा पुरस्कार दिला जातो. अशा प्रकारच्या पुरस्कारामुळे हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी मदत मिळते.

महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा ही द्वितीय भाषा म्हणून शाळांमध्ये अभ्यासली जाते. हिंदी भाषा ही देवनागरी लिपीमध्ये लिहिली जात असल्यामुळे मराठी भाषिकांना हिंदी भाषा ही अतिशय अल्प काळातच शिकण्यास मदत होते. कारण मराठी भाषा सुद्धा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते. मराठी भाषिक मुले हिंदी भाषा सहज आत्मसात करतात. अर्थात महाराष्ट्रातील हिंदी भाषेवर मराठी भाषेचा एक मोठा प्रभाव आहे.

महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषा दिवस कसा साजरा केला जातो?

14 सप्टेंबरला हिंदी भाषा दिन असल्यामुळे अगोदरच शाळांमध्ये हिंदी भाषा दिवस साजरा करण्याची पूर्वतयारी केली जाते त्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा काव्यलेखन स्पर्धा यासाठी विषय दिले जातात. 14 सप्टेंबरला हिंदी भाषा दिन साजरा करत असताना या सर्व स्पर्धा होत असतात. चित्रकला स्पर्धा आणि पोस्टर स्पर्धा सुद्धा या निमित्ताने घेतली जाते. या शिवाय या दिवशी सर्व शिक्षक आणि विद्यार्थी हिंदी भाषेमधून बोलत असतात.

हिंदी भाषेमध्ये प्रचंड मोठे साहित्य निर्माण झाले आहे. हिंदी भाषेतील गाणी भारतातील प्रत्येक माणसाच्या पोटावर सहज खेळत असतात.हिंदी भाषा ही अतिशय समृद्ध साहित्यिक परंपरा असलेली भाषा आहे.हिंदी भाषेमध्ये खूप मोठे साहित्यिक होऊन गेले. ज्ञानपीठ सारखे पुरस्कार या साहित्यिकांना मिळालेले आहेत.

मुंबईच्या बॉलीवुड मध्ये हिंदी भाषिक चित्रपटांची प्रचंड मोठ्या प्रमाणावर निर्मिती होत असते. हिंदी भाषेतील चित्रपट संपूर्ण जगभरामध्ये पाहिले जातात. आठवड्यातील शुक्रवार हा दिवस भारतामध्ये साधारणतः हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा दिवस असतो. या दिवशी हिंदी चित्रपट प्रदर्शित होतात चित्रपट प्रेमी रसिक लोक सुद्धा शुक्रवारची आवर्जून वाट पाहतात.

हिंदी चित्रपटांमुळे आणि टीव्हीवरील विविध वाहिन्यांवर असलेल्या मालिकांमुळे हिंदी भाषा ही भारतातील खेडोपाडी यामध्ये आढळस्थान मिळवून राहिली आहे. म्हणजेच हिंदी चित्रपट आणि टीव्ही वाहिन्या यांचे योगदान हिंदी भाषेच्या प्रचार आणि प्रसार यामध्ये अतिशय महत्त्वाचे आणि मौल्यवान आहे. खेडोपाड्यातील मुलेसुद्धा हिंदी भाषा टीव्ही पाहता पाहता सहज शिकतात हे एक बोलके उदाहरण म्हणता येईल.

हिंदी भाषा ही इंडो आर्यन कुळातील एक भाषा आहे. वैदिक संस्कृती मधील संस्कृत भाषेचा हिंदी भाषेवर प्रचंड मोठा पगडा आहे.हिंदी भाषेतील शब्द संस्कृत भाषेपासून फार मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. असे असले तरी हिंदी भाषेवर त्या त्या भागातील प्रादेशिक भाषांचा प्रभाव सुद्धा दिसून येतो.

उर्दू भाषा आणि हिंदी भाषे मध्ये बरेच साम्य आहे. उर्दू भाषेमध्ये अरबी आणि फारसी भाषेतील शब्दांचा फार मोठा समावेश आहे. असे असले तरीही हिंदी भाषा बोलणारा व्यक्ती उर्दू भाषा सहजतेने समजू शकतो हिंदी भाषेची अंगभूत शक्ती आहे.

हिंदी भाषा भारताशिवाय नेपाळ,बांगलादेश, मॉरिशस, मालदीव, भूतान, फिजी, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका अशा देशांमध्ये बोलली जाते.
भारत हा एक बहुभाषिक देश आहे. भारतामध्ये अनेक भाषा अतिशय समृद्ध परंपरा घेऊन शतकानुशतके बोलल्या जातात. भारत देश सर्व भाषांचा सन्मान करतो.

जगातील प्रत्येक देशाला अधिकृत अशी राष्ट्रभाषा असते. भारत देशाची संपूर्ण देशात बोलली जाणारी एकमेव भाषा हिंदी आहे.भारताच्या विकासामध्ये हिंदी भाषेचा राष्ट्रभाषा म्हणून सर्वांनी सन्मान ठेवला, तिचा प्रचार आणि प्रसार केला तर भरच पडेल.

 

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment