भारताच्या 10 देणग्या 10 Gifts Of India

भारताच्या 10 देणग्या 10 Gifts Of India

या लेखामध्ये आपण भारताने जगाला दिलेल्या दहा महत्त्वाच्या देणग्या 10 Gifts Of India कोणत्या ते पाहणार आहोत.

योग(Yoga)

योग ही भारताने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. प्राचीन काळापासून भारतीयांना योगाचे आकर्षण आहे.योगाचे केवळ धार्मिक महत्त्व नसून ते आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अतिशय गरजेचे साधन आहे. योगाचे अनेक प्रकार असले तरी मुख्यतः योगासने आपल्या उत्तम मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी केली जातात. आज संपूर्ण जगभर योग प्रणाली प्रसिद्ध आहे. जगभरातील अनेक लोक योग आणि योगी लोकांची भेट घेण्यासाठी आजही भारतात विशेषता हिमालय पर्वत भागात येत असतात.संयुक्त राष्ट्र संघटनेने 21 जून हा दिवस योग दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आणि जगभर पुन्हा योगाची लाट आली. आज संपूर्ण जगात प्रत्येक व्यक्तीपर्यंत योग पोहोचलेला आहे.

आयुर्वेद(Ayurveda)

योगानंतर आयुर्वेद औषध प्रणाली ही भारताची जगाला फार मोठी देणगी दिलेली आहे. आयुर्वेदाचा उगम भारतामध्ये झाला. संपूर्ण जगभर एक स्वतंत्र अशी आयुष्य जगण्याची कला आयुर्वेदाने दिलेली आहे. अथर्ववेदापासून आयुर्वेदाची उत्पत्ती झाली असे म्हटले जाते. चरक शिष्रोत नागार्जुन इत्यादी प्राचीन आयुर्वेदाचार्यांनी आयुर्वेद समृद्ध केला. भारताची ही जगाला दिलेली एक मोठी देणगी असून आयुर्वेद म्हटले की भारत देश जगातील कोणत्याही व्यक्तीच्या नजरेसमोर येतो.

बुद्धिबळ( Chess)

जगभर बुद्धिबळाचा खेळ खेळला जातो. परंतु याचे उगमस्थान भारत देश आहे. या खेळाला भारतामध्ये फार पूर्वीपासून राजमान्यता मिळालेली आहे.बुद्धिबळाला भारतामध्ये चतुरंग असे नाव होते. आजचे आधुनिक बुद्धिबळाचे रूप थोडेसे वेगळे असले तरी बुद्धिबळ ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे.

गणित( Maths)

भारतामध्ये आज आपण जे जगभर अंक वापरतो त्याचा शोध लागलेला आहे. एवढेच काय शून्य ही भारतीय लोकांनी जगाला दिलेली फार मोठी देणगी आहे.भारताने गणितामध्ये शून्य, दशांश प्रणाली आणि बीजगणित आणि त्रिकोणमितीच्या विकासासह अनेक महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारतातील भास्कराचार्य आर्यभट्ट वराह मिहीर ब्रह्मगुप्त इत्यादी गणितींनी गणिताला दिलेले योगदान खूप मोठे आहे.

मसाले(Spices)

भारत त्याच्या वैविध्यपूर्ण आणि चवदार पाककृतीसाठी ओळखला जातो. फार प्राचीन काळापासून भारतीयांनी मसाल्याची पिके उत्पादन करून देशोदेशींच्या बाजारपेठेमध्ये जाऊन त्यांचा व्यापार केलेला आहे त्यामुळे भारत हा मसाल्यांचा देश म्हणून संपूर्ण जगभरात फार प्राचीन काळापासून प्रसिद्ध होता. भारतीय मसाले जगभरात फार प्रसिद्ध आहेत. भारतातील मसाले युरोप,आफ्रिका,अमेरिका,मध्यपूर्व आशिया खंडामध्ये अतिशय मागणी असलेली पदार्थ आजही आहेत.

धर्मज्ञान(Religion)

भारत ही धर्माची आद्यजननी आहे. संपूर्ण जगामध्ये धर्माचा उदय सुरुवातीला भारतामध्ये झाला. भारतामध्ये हिंदू धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म शीख धर्म अशा धर्मांचा उगम झाला. वेगवेगळे विचार आणि आचार प्रणाली असल्या तरी त्या सर्व धर्मांचा आत्मा हा मनुष्याचा उद्धार किंवा कल्याण कशात आहे या एकमेव विचारातच होता. आज जगाला सत्य, अहिंसा, शांती इत्यादी देणग्या या प्राचीन धर्मांनी दिलेलीआहे. भारतामध्ये जगातील पहिला ग्रंथ ऋग्वेद निर्माण झाला.पहिले महाकाव्य रामायण भारतात निर्माण झाले.

चार वेद,सहा शास्त्रे, अठरा पुराणे,अनेक उपनिषदे, विविध प्रकारचे धार्मिक ग्रंथ भारतामध्ये लिहिले गेले. आजही त्यावर भाष्य लिहिले जातात प्राचीन धर्माचाऱ्यांनी केलेल्या भाषांवर आजही विचार मंथन चालू असते. मानवी उन्नतीसाठी निर्माण झालेले हे धर्म जगामध्ये प्रचार आणि प्रसार पावले आहेत.भारतातील हे धर्म संपूर्ण जगासाठी एक आश्चर्याची बाब समजली जाते.

विद्यापीठ (University)

भारत देश हा प्राचीन काळापासून एक ज्ञानसंपन्न आणि ज्ञानाची उपासना करणाऱ्या लोकांचा देश आहे. भारतामध्ये तक्षशिला, नालंदा अशी प्राचीन विद्यापीठे होती. जगभरातून हजारो विद्यार्थी भारतामध्ये शिक्षण घेण्यासाठी येत. एका ठिकाणी विविध प्रकारच्या विद्या शिकण्यासाठी जगभरातून येणाऱ्या लोकांचा समुदाय जगामध्ये भारतीय लोकांचा लौकिक निर्माण करत आला आहे. जगातील पहिले विद्यापीठ भारतात होते ही भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट मानली जाते.

ध्यान( Meditation)

आज जगभरात लोक मानसिक शांततेसाठी ध्यान करतात मानसशास्त्रज्ञही ध्यान करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देतात आपल्याला आलेला मानसिक डिप्रेशनचा त्रास कमी करण्यासाठी त्याचप्रमाणे दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये येणारा मानसिक ताण घालवण्यासाठी ध्यानाचा उपयोग जगभर लोक करतात परंतु ध्यान करणे ही मुळातच भारतीयांनी शोधलेली एक पद्धत आहे. भारतातील धर्माचाऱ्यांनी ध्यानाला धार्मिक आणि अध्यात्मिक महत्त्व दिले आहे. तर जगभरातील मानसशास्त्रज्ञ उद्योगपती वैद्यकशास्त्र यांनी माणसाच्या शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक उन्नतीसाठी ध्यानाचा मार्ग किती अनमोल आहे हे सांगितले आहे.

चहा( Tea)

चहाची पहिली लागवड भारतात झाली आणि आज भारत जगातील सर्वात मोठ्या चहा उत्पादकांपैकी एक आहे. चहा हे जणू काही भारताचे राष्ट्रीय पेय आहे प्रत्येक भारतीय व्यक्ती चहा घेतोच. भारतातील आसामचा चहा तर जगभर प्रसिद्ध आहे भारतीय लोक चहा पिण्या विषयी फार उत्कट आणि चोखंदळ असतात.

बॉलीवूड( Bollywood)

बॉलीवूड, मुंबईस्थित हिंदी भाषेतील चित्रपट उद्योग, जगातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रभावशाली चित्रपट उद्योगांपैकी एक आहे. अमेरिकेतील हॉलिवूडच्या धर्तीवर भारतात असलेले बॉलीवूड ही एक आगळी वेगळी आणि मोठा रोजगार निर्माण करून देणारी इंडस्ट्री आहे.

भारताच्या 10 देणग्या 10 Gifts Of India आपल्याला निश्चितच हा लेख आवडला असेल. आपल्यासाठी आणखी काही सुंदर लेख खाली दिलेले आहेत आपण अवश्य वाचावे

स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव दिन Swatantryaveer Savarkar Gaurav Din

मार्टिन ल्यूथर किंग मराठीत माहिती Martin Luther King Marathi Information

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment