शाळा केव्हा सुरू होणार? When will school start?

 शाळा केव्हा सुरू होणार?When school will start?

” पप्पा- आई आम्ही खूप कंटाळलो आहोत, सांगाना शाळा  केव्हा  सुरू होणार? “

” कोरोना आहे ना…त्यामुळे नाही होणार लगेच. “

असा संवाद आता प्रत्येक घरात सुरू आहे. मुले शाळेविना कंटाळून गेली आहेत. पालक वैतागले आहेत. ऑनलाईन अभ्यास नको झाला आहे.पण करणार काय?परिस्थितीवर नियंत्रण येते कुठे नाहीतर पुढची लाट येते आणि मग सर्व नियोजन फसते.मुलांचा कंटाळा  आणि पालकांचा वैताग वाढत चाललाय. ही डिप्रेशनची नांदी तर नाही ना ? असे झाले तर बालवयातच अनेक आयुष्ये उध्वस्त होणार की काय असा भयानक प्रश्न आ वासून उभा राहील … आज आपण डिजिटल युगात आहोत.

इंटरनेट घराघरात पोहोचले आहे.मोबाईल नव्या युगाचे संपर्क माध्यम बनले आहेत. पण संवाद संपत चाललाय.जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला ओळख होणारे ते पहिले आणि खूप महत्त्व प्राप्त होत असणारे यंत्र  बनले आहे.मोबाईल मिनी संगणक बनून प्रत्येक माणसाच्या खिशात राहून आयुष्यरूपी खिसा कुरतणारा उंदीर कधी बनला हे कळले सुद्धा नाही.मनुष्य जात एखाद्याच छोट्या यंत्राने इतकी भांबावून जाईल असे स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते.

आणि हा भयानक परिणाम कोरोनाचा एक दृश्य परिणाम आहे.आणि दुःखाची गोष्ट अशी की यामध्ये लहान लहान मुले अडकली आहेत. ह्या चक्रव्यूहातून बाहेर पडणे अशक्य नसले तरी फार जिकीरीचे ठरणार आहे.
मुलं आता खूप कंटाळले आहेत त्यांना वाटते की शाळा कधी सुरू होणार .पण आता सगळ्यांच्याच नाईलाज झाला आहे. खरं तर कोरोना जगावरची फार मोठी आपत्ती आहे. चीनसारख्या देशातून ही आपत्ती सर्व जगभर पसरली आणि हाहाकार उडाला.

मोठ्या माणसाने कसं बस समजून घेतलं. पण लहान मुलांचं काय? त्यांना समजावता समजावता मोठ्यांची दमछाक झाली.

मग आता ही लहान मुलं काय करतायेत? घरोघरी ज्यांना शक्य आहे , ज्यांच्याकडे मोबाईल आहे ती  मुलं ऑनलाइन अभ्यासाचे क्लास अटेंड करत आहेत. इतर मुलांना मात्र शिक्षक घरोघरी जाऊन थोडाफार शिकवत आहेत येत आहेत. स्वाध्याय देत आहे . परंतु हा कसाबसा होणारा अभ्यास विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मारक ठरत आहे. दुधाची तहान ताकावर भागवणे असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे.

तर मग आता पालक म्हणून आपण काय करु शकतो? याचा विचार गांभीर्याने पालकांनी केला पाहिजे. कारण आपल्या मुलांचे भवितव्य अंधारात आहे हे चित्र स्पष्ट झाले आहे. आपण बऱ्याचदा पाहतो अनेक लोक बेशिस्त वागतांना दिसून येतात. या लोकांना पोलिसांच्या दंडुक्याने किंवा आजाराच्या भीतीने कोणाचे मार्गदर्शन घेऊन कधी समज निर्माण होणार हा मोठा प्रश्न सुज्ञ आणि सभ्य समाजासमोर निर्माण झाला आहे.

पण पालक म्हणून आपल्याला आपली जबाबदारी आपण पार पाडणे आवश्यक आहे. पालक काय करू शकतात? पालकांनी आपले मूल  क्लास व्यवस्थित अटेंड करते की नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. ऑफलाईन दिलेला अभ्यास स्वाध्याय मुले कशी सोडवतात हे पाहिले पाहिजे. तसेच हे सोडून मुलांना पाठ्यपुस्तके वाचायला प्रोत्साहित केले पाहिजे.

याशिवाय वाचनाचा छंद मुलांना लावला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके बाजारात उपलब्ध असतात. मुलांच्या अभ्यासाला अनुसरून त्यांची आवड पाहून पुस्तके त्याच्या हातात दिली पाहिजेत. आपणही एखादे चांगले पुस्तक निवडून घरातच वाचनाचा तास सर्वांनी एकत्र बसून सुरू केला पाहिजे. त्यातून मुलांचा बहुश्रुतपणा वाढेल. भाषेची समृद्धी होईल आणि महत्वाचे म्हणजे त्यांचे सर्व विषयांचे आकलन करून घेण्यासाठी  अत्यावश्यक असणारी क्षमता अधिक समृद्ध होईल. त्यांच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी ही गोष्ट आहे.

एक पालक म्हणून आपण आपल्या मुलांसाठी खूप काही करू शकतो. त्या सर्व शक्यता आपण आजमावून पाहिल्या पाहिजेत. कोरोनामुळे घरातच राहावे लागल्यामुळे कदाचित काही आईवडील त्यांची अगतिकता, मुलांना जाणवणारा एकाकीपणा, यामुळे होणारी चिडचिड थांबवण्यासाठी मुलांबरोबर बसले पाहिजे. त्यांच्याशी बोलले पाहिजे. सुसंवाद ठेवून, मुलांच्या भावनांना हात घालून, त्याच्याशी आपला असणारा संवाद अधिक वाढवला पाहिजे.

कोरोनाच्या साथीच्या निमित्ताने पालकांना मला असे सांगावेसे वाटते; की खरे तर मुलांची पहिली शाळा आपले कुटुंबच असते. मग घर म्हणजे ही जर एक शाळा झाली तर घरामध्ये असणारे वातावरण हे केवळ अभ्यासाचे न ठेवता त्यातून सर्वांशी परस्परसंवाद असणारी आपली कौटुंबिक चौकट अधिक उत्तम कशी होईल याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची वेळ आली आहे.

तरीही शाळा केव्हा सुरू होणार हा प्रश्न अनुत्तरित राहतो .कारण शासनाला जरी शाळा सुरू व्हाव्यात असे वाटले, मुलांना जरी शाळा सुरू कराव्यात असे वाटले, पालकांना जरी शाळा सुरू हव्यात असे वाटले, तरी सुद्धा शाळा आपल्याला पाहिजे तेव्हा सुरू होणार नाही. हे स्पष्ट दिसत आहे. म्हणून पालक मित्रहो, शाळा शाळा करीत बसू नका कारण सर्व काही कोरोना साथीमुळे बिघडून गेले आहे. आणि ही साथ आटोक्यात आणण्यासाठी आपल्या सर्वांना, समाजातील प्रत्येकाला शिस्तपूर्वक राहून आपले जीवन पुढे नेले पाहिजे.

आपल्या घरी संगणक असेल तर; अभ्यासाविषयक विविध प्रकारच्या वेबसाईट्स शोधून त्यावरून शिकले पाहिजे. नसेल तर विविध ऑफलाईन माध्यमांचा वापर करून आपण आपल्या पाल्यांना त्यांच्या  क्षमता वाढण्यासाठी वेळ देऊन काम केले पाहिजे. तर आणि तरच काही ना काही आपल्या पाल्याच्या भवितव्याला आकार देण्यासाठीचा आधार निर्माण होईल. हे पक्के ध्यानात ठेवावे असे मला वाटते.

थोडक्यात काय तर पालक मित्रहो, मुलांच्या शिक्षणाकडे शाळा शाळा करीत न बसता म्हणजे त्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल होईल. कारण सध्या तरी शाळा चालू होण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या मुलाकडे हे जाणीवपूर्वक लक्ष देऊन त्याला शिक्षणाची गोडी लावली पाहिजे. यातच त्या मुलाच्या भवितव्याची मला वाटत असलेली काळजी दिसून येईल.

कोरडा विसरणे जगभर धुमाकूळ घातलेला आहे. कोरोनाविषाणू अनेक लाटा घेऊन येत आहे तिसरी लाट अतिशय जोरदार असून ती मुलांच्या आरोग्यावर अतिशय घातक परिणाम करील. असे इशारे वैज्ञानिकांनी दिलेले आहेत.हे इशारे आपण सर्वांनी ध्यानी घेतले पाहिजेत.

मुलांनी पालकांच्या मूलभूत क्षमता टिकून राहतील यासाठी घरीच ठराव घेतला पाहिजे. मुलांच्या अध्ययन क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती यांचा जाणीवपूर्वक अभ्यास करून त्यांच्यामध्ये अध्ययन निष्पत्ती येण्यासाठी स्वतःहून प्रयत्न केले पाहिजेत. नियमितपणे मुलांचा अभ्यास घेतला पाहिजे. त्यांच्याकडून स्वाध्याय सोडून घेतला पाहिजे. स्वाध्यायामुळे त्यांचा सराव होईल. सरावाने क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती अधिकाधिक निर्माण होतील.  क्षमता निर्माण झाल्या आणि अध्ययन निष्पत्ती मुलांमध्ये निर्माण झाली की  शिक्षणाच्या मोठ्या प्रवाहात मुले नक्कीच येतात.

आणखी काही सुंदर निबंध वाचण्यासाठी क्लिक करा.

महात्मा गांधीं वर मराठी निबंध व भाषणे

गणेशोत्सव निबंध

हरियाल महाराष्ट्राचा राज्यपक्षी Hariyal amazing state bird of Maharashtra 

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment