माझा आवडता नेता लालबहादूर शास्त्री Maza Avadata Neta Nibandh

माझा आवडता नेता लालबहादूर शास्त्री निबंध Maza Avadata Neta Nibandh

माझा आवडता नेता लालबहादूर शास्त्री निबंध Maza Avadata Neta Nibandh

Maza Avadata Neta
माझा आवडता नेता Maza Avadata Neta

भारत देश हा महान नेत्यांची, महापुरूषांची खाण आहे. अनेक महान नेते भारत देशाने जगाला दिले.पण या नेत्यांमध्ये मला (Maza Avadata Neta) भारताचे दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री खूप आवडतात.

लालबहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी वाराणसीपासून सात मैल अंतरावर असलेल्या मुगलसराय या गावात झाला.लाल बहादुर शास्त्री यांचे वडील एक शिक्षक होते. लालबहादूर शास्त्री केवळ दीड वर्षाचे असताना त्यांचे वडील मृत्यू पावले. आई आपल्या तीन मुलांना घेऊन वडिलांच्या घरी जाऊन राहिली.बालपण त्यांचे गरिबीत गेले.

माझा आवडता खेळाडू रोहित शर्मा Maza Avadata kheladu Rohit Sharma

वाराणसीतील आपल्‍या काकांच्या घरी शिक्षणासाठी लालबहादूर शास्त्री जाऊन राहिले. लालबहादूर शास्त्रींना लहानपणी सर्वजण नन्हे म्हणत. उंचीने लहान असले तरी आपल्या कार्यकर्तृत्वाने ते मोठे झाले. काशी येथील विद्यापीठात त्यांनी शास्त्री ही पदवी संपादन केली. लालबहादूर शास्त्री संस्कृत भाषेचे पदवीधर होते.पण आपल्या ज्ञानाचा आणि कर्तृत्वाचा अभिमान त्यांना कधी झाला नाही. भारतमातेचा एक नम्र सेवक म्हणून त्यांचे आयुष्य अत्यंत आदर्श राहिले.

तो काळ गांधी युगाचा होता. महात्मा गांधींनी एक सभेत भारतातील राजेरजवाडे आणि संस्थानिक यांच्यावर निर्भयपणे कठोर शब्दांत टीका केली. त्यामुळे लालबहादूर शास्त्री अत्यंत प्रभावित झाले. भारताच्या स्वातंत्र्यसमरात स्वतःला झोकून देऊन देशाचे स्वातंत्र्ययुद्ध महात्मा गांधींच्या नेतृत्वात मिळेन; अशा दृढ विश्वासाने लालबहादूर शास्त्रींनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला.

माझा आवडता संशोधक निबंध Maza Avadata Sanshodhak

लालबहादूर शास्त्री अत्यंत दृढनिश्चयी स्वभावाची व्यक्तिमत्व होतं. महात्मा गांधींनी असहकार आंदोलन छेडले त्यावेळी शास्त्रीजींच्या वय फक्त सोळा वर्षाचे होते.परंतु शास्त्रीजींनी असहकार आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. शिक्षणाकडे पाठ फिरवली. आईने त्यांना समजावून सांगितले. जवळचे नातेवाईक, मित्रांनी समजावून सांगितले. परंतु शास्त्रींचा निर्णय अगदी पक्का होता आणि सर्वांना तो माहीत होता.

1927 या वर्षामध्ये लाल बहादूर शास्त्री यांचा विवाह झाला मिर्जापुर येथील एका सामान्य कुटुंबातील ललिता ही त्यांची सौभाग्यवती झाली. त्यावेळच्या पारंपारिक प्रथेनुसार हुंडा देण्यात आला.पण एक चरखा आणि चरख्यावर विणलेले कापड हुंडा म्हणून घेण्यात शास्त्रीजींनी धन्यता मानली.

1930 मध्ये झालेल्या मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी महात्मा गांधींनी दांडी यात्रा काढली देशभर फार मोठे विचारमंथन या निमित्ताने घडले. स्वातंत्र्यसंग्रामात अनेकदा शास्त्रीजींनी सहभाग घेतला. अन्यायी ब्रिटिशांनी त्यांना अनेकदा तुरुंगात टाकले. सुमारे सात वर्ष त्यांनी तुरुंगात काढली. स्वातंत्र्यसंग्रामात अनेक आंदोलनात सहभागी झाल्यामुळे शास्त्रींचे एक कणखर,नम्र, शिस्तप्रिय,मूल्यप्रिय आणि परिपक्व नेतृत्व असणारे व्यक्तिमत्व निर्माण झाले.

सूर्य उगवला नाही तर निबंध Surya Ugavala Nahi tar

1946 मध्ये उत्तर प्रदेशात सुरुवातीस संसदीय सचिव आणि नंतर गृहमंत्री पद लालबहादूर शास्त्री यांनी अतिशय सक्षमपणे सांभाळले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आणि भारतात राज्यघटना लागू झाल्यानंतर शास्त्रीजींना काँग्रेस नेतृत्वाने दिल्लीत बोलावून 1951 मध्ये मंत्रिमंडळात स्थान दिले. लालबहादूर शास्त्री रेल्वेमंत्री झाले.या ठिकाणीही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. याशिवाय परिवहन मंत्री, वाणिज्यमंत्री, उद्योग मंत्री म्हणूनही त्यांनी कार्यभार पहिला आणि आपल्या या कार्यक्षम कार्यपद्धतीचा परिचय संपूर्ण देशाला दिला.

लालबहादूर शास्त्री

रेल्वेमंत्री म्हणून कारभार पाहत असताना एका रेल्वे अपघातामध्ये अनेक प्रवासी ठार झाले या घटनेची जबाबदारी घेऊन लालबहादूर शास्त्रींनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा दिला. संसदेमध्ये बोलताना त्यांनी “मी शारीरिक दृष्ट्या कमजोर दिसत असलो तरी आंतरिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि बलवान आहे.” हे लोकप्रतिनिधींना ठणकावून सांगितले.

महात्मा गांधींच्या शिष्याने पंडित नेहरू त्यांच्या मृत्यूनंतर देशाचे पंतप्रधान पद अतिशय सक्षमपणे सांभाळले. त्या काळामध्ये भारताला अन्नधान्याचा सतत तुटवडा निर्माण होत असे. शास्त्रीजींनी “जय जवान जय किसान” ही महत्त्वपूर्ण घोषणा देऊन भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी हरितक्रांतीचा उद्घोष केला. शेतामध्ये राबणारा शेतकरी आणि सीमेवर असणारा वीर जवान अत्यंत ठामपणे उभा राहिला. भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला.

1965 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध झाले. लालबहादूर शास्त्रीजींच्या नेतृत्वामध्ये पाकिस्तान विरुद्धचे युद्ध भारताने जिंकले. शास्त्रीजींच्या नेतृत्वात भारताने पाकिस्तानला धूळ चारली. चारीमुंड्या चीत केले. रशियाने या युद्धामध्ये मध्यस्थी केली.तेव्हा ताश्कंद करारासाठी रशियाला गेलेले असताना 11 जानेवारी 1966 रोजी त्या ठिकाणी हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन शास्त्रीजी मृत्यूमुखी पडले. अर्थात कर्तृत्वाने अमर झाले.

“मूर्ती लहान पण कीर्ती महान” या वचनाप्रमाणे शास्त्रीजींची जीवन होते लालबहादूर शास्त्री आपल्या शारीरिक उंचीने लहान असले तरी, आपल्या कार्यकर्तृत्वाच्या उंचीने हिमालयाएवढे मोठे होते; यात शंकाच नाही. शास्त्रीजींचे राहणीमान अत्यंत साधे होते; परंतु नैतिक उंची अत्यंत मोठी होती. साधी राहणी उच्च विचारसरणी ही त्यांच्या जीवनाची एक सरळ दिशा होती असेच म्हणावे लागेल.

भारत सरकारने लालबहादूर शास्त्री यांना मरणोपरांत भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविले.असा हा माझा आवडता Maza Avadata Neta नेता मला अत्यंत आवडतो. लालबहादूर शास्त्रींचा प्रेरणादायी जीवन प्रवास माझ्यासाठी अतिशय प्रेरक आणि उद्बोधक आहे.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment