सुविचार Suvichar Good Thoughts In Marathi

सुविचार Suvichar Good Thoughts In Marathi

सुविचार Suvichar Good Thoughts In Marathi

” सुविचार म्हणजे आपल्या अंतःकरणातील सुंदर विचारांचा आरसा असतो.”

 1. मूर्ख लोक दुसऱ्यांना उपदेश करतात;तर शहाणे लोक स्वतःलाच उपदेश करतात.
 2. स्वच्छ होण्यासाठी झिजावे लागते. पवित्र होण्यासाठी जगावे लागते आणि अंकुरित होण्यासाठी गाडून घ्यावे लागते.
 3. दुःख भोगल्यावर सुखाची किंमत कळते.
 4. सर्व सद्गुणांचा सुंदर पाया म्हणजे नम्रता.
 5. माणसे कोणत्या गोष्टीला हसतात ते पाहावे, त्यावरून त्यांच्या चारित्र्याची कल्पना येते.
 6. माणूस किती मिळवतो यापेक्षा किती देतो यावरच त्याची श्रीमंती ठरते.
 7. स्वतःच्या दोषांची जाणीव होणे, हे माणसाच्या शहाणपणाचे पहिले लक्षण होय.
 8. ग्रंथ व मित्र थोडेच असावेत पण ते चांगलेच असावेत.
 9. अनेक दुःखांचे मूळ ‘ आळस ‘ आहे.
 10. प्रार्थना म्हणल्याने आपला अहंकार दूर होतो आणि विश्वात्म्याशी एकतानता होते.
 11. सुंदर कला म्हणजे निसर्गाचे अनुकरण असते.
 12. खरा आनंद दुसर्‍यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो.
 13. हजार गुण प्राप्त करणे सोपे असते; पण एक दोष दूर करणे कठीण असते.
 14. चांगल्या पुस्तकांसारखा उत्तम मित्र दुसरा कोणताही नाही.
 15. प्रेम करणे ही कला आहे; परंतु प्रेम टिकविणे ही एक साधना आहे.
 16. प्रार्थना म्हणजे आत्म्याचा आहार आहे.
 17. विवेक बुद्धी नसणारे लोक शिंगाशिवाय असणाऱ्या पशूप्रमाणे असतात.
 18. नेहमी अज्ञानापोटीच भयाची निर्मिती होत असते.
 19. जो मनाला जिंकतो तो जगालाही जिंकू शकतो.
 20. मातेच्या ममतेचा एक बिंदूही अमृताच्या समुद्रापेक्षा मधुर असतो.
 21. लोभ म्हणजे पाप अधर्म व कपटाचे मूळ आहे.
 22. तुमचे सौख्य तुमच्या विचारांवर अवलंबून असते.
 23. विवेक हा मनुष्याचा सर्वात मोठा मित्र आहे.
 24. अज्ञानामुळे विश्वासाचा अभाव निर्माण होतो.
 25. आळस अज्ञान व अंधश्रद्धा हे माणसाचे सर्वात मोठे तीन शत्रू आहेत.
 26. आनंदी वृत्ती आणि समाधान ही फार मोठी सौंदर्यवर्धक साधने आहेत.
 27. सेवेमुळे शत्रूदेखील मित्र बनतो.
 28. क्षमा हे वीरांचे भूषण आहे
 29. ज्ञान म्हणजे मानव जातीची सार आहे
 30. दुष्ट लोक कधीच विवेकी नसतात.
 31. कोणताही थोर माणूस मला कधी संधीच मिळाली नाही अशी तक्रार करत नाही
 32. अंगात जुना सदरा असला तरी चालेल पण नवे पुस्तक घ्या
 33. मोती होऊन सोन्याच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्चाया चातकाची तहान भागविणे अधिक चांगले. —– सानेगुरुजी
 34. समाधान म्हणजे मूर्तिमंत परिसच.त्याच्या स्पर्शाने सर्व गोष्टींचे सोने होते.
 35. भेदाभेद ही मानव समाजाला लागलेली कीड आहे.
 36. जी कृती किंवा संस्कार समाजाला समता सभ्यता सामंजस्य सहिष्णुता व समाधान याजकडे नेते त्यालाच खऱ्या अर्थाने संस्कृती असे म्हणतात
 37. मनाला शुद्ध करणारी प्रत्येक गोष्ट प्रत्येक जागा म्हणजे ईश्वर
 38. जो आत्मबळावर जगतो त्याच्या मागे मानसन्मान नाचत येतो.
 39. प्रार्थना म्हणजे मनाचे स्नान होय
 40. मुक्त करते ती विद्या बाकी सर्व अविद्या.
 41. जंगले वाढवा आयुष्य वाढेल
 42. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
 43. अपयशातून शिकणे ही यशाची पहिली पायरी होय.
 44. नमस्कार हा चमत्कारालाच होतो म्हणून आपण काहीतरी कर्तृत्व गाजवून मोठे झाले पाहिजे.
 45. मुर्खांच्या नादी लागणे म्हणजे जगात आणखी एका मुर्खाची भर टाकणे होय.
 46. एक चित्र हजारो शब्दांचे काम करते.
 47. देतो तो देव आणि राखतो तो राक्षस. म्हणून देणाऱ्या देवासारखे व्हा राखणाऱ्या राक्षसासारखे नको.
 48. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे,घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे.
 49. अंतःकरणाचे सौंदर्य आपल्या आचरणातून आणि विचारातून व्यक्त होत असते.
 50. सुखाची चटक लागली की दुःखाच्या कल्पनेचे चटके बसायला सुरुवात होते
 51. माणसाच्या आयुष्यात सुख हे राईएवढे असते; तर दुःख हे पर्वताएवढे असते.

Suvichar Good Thoughts In Marathi

प्रेरणा जिजाऊंची, वसा सावित्रीचा निबंध Prerana Jijaunchi Vasa Savitricha

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment