सेवा हाच धर्म मराठी बोधकथा क्रमांक 2 Bodhkatha

सेवा हाच धर्म बोधकथा क्रमांक 2 Bodhkatha 2

सेवा हाच धर्म Bodhkatha ही बोधकथा स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील एक सत्य घटना आहे.

स्वामी विवेकानंद यांची ख्याती जगभर पसरली होती.एकदा एका पत्रकाराने स्वामी विवेकानंदांची कीर्ती ऐकल्यानंतर त्यांना भेटून त्यांच्याकडून चार ज्ञानाच्या गोष्टी शिकाव्यात अशी तीव्र इच्छा व्यक्त केली. त्या पत्रकाराचे दोन मित्र त्याला भेटावयास आले आणि बोलता बोलता स्वामी विवेकानंदांचा उल्लेख निघाला.तिघांनी विवेकानंदांना भेटायला जाण्याचे ठरवले.तिघेही मिळून स्वामीजींकडे गेले.

स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंदांनी त्या तिघांची ही अतिशय आस्थेने विचारपूस केली. यादरम्यान स्वामीजींना असे कळाले की तिघेही पंजाब प्रांतात राहणारे आहेत.त्या काळात पंजाबात दुष्काळ पडलेला होता.त्यांनी त्या संदर्भात चर्चा केली. दुष्काळग्रस्तांसाठी चाललेल्या मदत कार्याची माहिती घेतली.त्यानंतर शैक्षणिक, नैतिक आणि सामाजिक बाबींवर चर्चा केली.

बराच वेळ झाल्यानंतर तिघेही निघाले. पत्रकार महाशय स्वामी विवेकानंदांना म्हणाले,” स्वामीजी, आम्ही तुमच्याकडे धार्मिक उपदेश मिळेल या उद्देशाने आलो होतो. पण तुम्ही मात्र सामान्य अशा बाबींवरच चर्चा केली. आम्हाला यातून ज्ञानवर्धक असे काहीच मिळाले नाही.”

योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद Awesome essay on swami Vivekananda in Marathi

ते पत्रकार असे बोलल्यानंतर स्वामीजींनी त्यांना अतिशय मार्मिक भाषेत उत्तर दिले. स्वामीजी म्हणाले,”मित्रवर्य, जोपर्यंत या देशांमध्ये एक जरी मूल उपाशी राहिले तर धर्माची चर्चा करण्यापेक्षा त्याची भूक कशी भागवता येईल हे पाहणे जास्त महत्त्वाचे आहे. ज्याचे पोट भरलेले नाही त्याला धर्माचा उपदेश देण्यापेक्षा त्याच्या हातात भाकरी देणे जास्त महत्त्वाचे आहे. रिकाम्या पोटी तत्त्वज्ञानाचा उपदेश काहीच उपयोगाचा नाही.

तात्पर्य:- “ज्याचे पोट भरलेले नाही;त्याला धर्माचा उपदेश देण्यापेक्षा त्याच्या पोटाला अन्न देणे हे महत्त्वाचे आहे. रिकाम्या पोटी कोणत्याही तत्त्वज्ञानाचा उपदेश उपयोगाचा नसतो.”

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment