मूळ स्वभाव मराठी बोधकथा क्रमांक 1 Bodhkatha

मूळ स्वभाव बोधकथा क्रमांक 1 Bodhkatha

बोधकथा मूळ स्वभाव Bodhkatha

जंगलात एक हरीणीचे पाडस चरत होते. अचानक त्या ठिकाणी एक चित्ता आला. पाडस जीव वाचवण्यासाठी दाट वेलींच्या जाळ्यात घुसले. त्याला पकडण्यासाठी चित्ताही त्या जाळीत घुसला. पाडस छोटे होते ते सहजच जाळीतून पळून गेले. मात्र चित्ता त्या जाळीमध्ये अडकून बसला.

त्याच वेळी त्या ठिकाणी एक शेतकरी तेथून जात होता. चित्त्याने शेतकऱ्याला जाळीतून काढण्याची विनंती केली. पण शेतकरी म्हणाला तू जंगली प्राणी, तुझा काय भरवसा? तुला सोडल्यावर तू मलाच खाऊन टाकशील.चित्त्याने तसे करणार नाही असे आश्वासन त्या शेतकऱ्याला दिले.

शेतकऱ्याने त्याला जाळीमधून मोकळे केले. तेव्हा चित्त्याने आपला मूळ स्वभाव दाखवला. शेतकऱ्याला खाण्याची भाषा चित्ता करू लागला.शेतकरी म्हणाला,” हे बघ मी तुला मुक्त केले हाच माझ्या सहकार्याचा मोबदला का?” चित्त्याने भुकेचे कारण सांगितले. तेवढ्यात त्या ठिकाणी एक मोठा लांडगा आला.दोघांची चर्चा ऐकून तो शेतकऱ्याला म्हणाला,” हा एवढा मोठा चित्ता वाऱ्याच्या वेगाने भरधाव पाळणारा आणि हा एवढ्याशा जाळीत कसा अडकून पडेल? तू खोटं बोलतो आहेस. तू एवढ्या मोठ्या चित्त्याला वाचवलं हे खोटं आहे.हा संकटात फसू शकत नाही. तू जाळीत कसा काय अडकला हे मला दाखव. मग तू खरा चित्ता हे पाहू.”

हे ऐकून चित्याही घमेंडीत गेला. तो परत जाळीत गेला व पुन्हा जाळीमध्ये चांगला अडकून बसला. त्याच वेळेला लांडगा शेतकऱ्याला म्हणाला,”अरे मित्रा, आता तरी पळ नाहीतर हा चित्ता तुला पुन्हा फसवेल.

तात्पर्य:-जे नेहमी विश्वासघातकी राहिले त्यांवर कधीच विश्वास ठेवणे चांगले नाही.कारण ते त्यांचा मूळ स्वभाव सोडत नसतात.

योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद Awesome essay on swami Vivekananda in Marathi

बोधकथा 1 मूळ स्वभाव Bodhkatha 1

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment