केवलप्रयोगी अव्यय Kevalprayogi Avyay

केवलप्रयोगी अव्यय Kevalprayogi Avyay

केवलप्रयोगी अव्यय Kevalprayogi Avyay

मनातील भावना व्यक्‍त करणाऱ्या उद्‌गारवाची अविकारी शब्दाला केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.

केवलप्रयोगी अव्ययांचे भावनांवरून प्रकार :

(1) हर्षदर्शक – वा, अहाहा, ओहो, वावा

(2) शोकदर्शक – अरेरे, अगाई, हायहाय, ऊः, हाय, आईग

. (3) आशचर्यदर्शक – अबब, बापरे, अहाहा, अरेच्या, ऑ. ओहो

(4) प्रशंसादर्शक – शाबास, भले, वाहवा, छान, फक्कड, खाशी

(5) संमतिदर्शक – हां, जी, ठीक, अच्छा बराय

(6) विरोधदर्शक – छे, छट, छेछे, च, अंहं

(7) तिरस्कारदर्शक – शीः, धुः, छी, हुइत, छत्‌

(8) संबोधनदर्शक – अग, अरे, ए, अहो, रे, अगा

(9) मौनदर्शक – गप्‌, चिप्‌, चुप्‌, गुपचिप्‌

(10) व्यर्थ उद्गारवाचक अव्यये – जे उद्गारवाचक शब्द भावना किंवा अर्थही व्यक्‍त करीत नाहीत.म्हणजेच वाक्यांत व्यर्थ येत असल्यामुळे त्यांना ‘व्यर्थ उद्गारवाचक अव्यय” असे म्हणतात.

उदा. – म्हणे, बापडा, आपला, बेटे इत्यादी

(1) काल रात्री म्हणे भूकंप झाला.

(2)एवढं बोलूनही तो बापडा गप्प राहीला.

(3) मी आपला शांतराहीलो.

(4) पण काळीज बेटे स्वस्थ राहीना.

पादपूराणार्थक केवलप्रयोगी अव्यये किंवा पालुपदे –

लकब किंवा काही आठवेनासे झाले की काही शब्द उगीचच पुनःपुन्हा येतात. अशा शब्दांना पादपूराणार्थक केवलप्रयोगी अव्यये अथवा पालुपदे म्हणतात. उदा. – बरंका, जळूलं मेलं, आत्ता, कळलं इत्यादी.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment